नवी दिल्ली : सिद्ध अर्थतज्ज्ञ व ज्येष्ठ राजकारणी म्हणून प्रणव मुखर्जी ओळखले जातात. ते भारत देशाचे 13 वे राष्ट्रपती आहेत. 11 डिसेंबर 1935 मध्ये जन्मलेले प्रणव मुखर्जी हे 6 दशकांच्या सक्रिय राजकारणात लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहिले. केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री,संरक्षणमंत्री, वाणिज्य व उद्योगमंत्री आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. भारत देशाचे प्रथम नागरिक अर्थात राष्ट्रपती म्हणून त्यांनी यशस्वीपणे पाच वर्ष कार्य केले.