Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लिव्हप्युअरने नवे आरओ वॉटर प्युरिफायर लाँच केले

७०% पाण्याची पुनर्प्राप्ती करणारे जगातील पहिले आरओ वॉटर प्युरिफायर

मुंबई : आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली प्रदान करणाऱ्या लिव्हप्युअरने फ्युचरिस्टिक रेंजमध्ये आरओ (Reverse Osmosis) आधारीत वॉटर प्युरिफायर क्षेत्रात आणखी एक मोठी प्रगती केली आहे. सध्याच्या आरओमधून २५ ते ३० टक्के पाण्याची पुनर्प्राप्ती(रिकव्हरी) होते तर नव्या आरओमधून ७० टक्के पुनप्राप्ती होईल. याद्वारे प्रत्येक घरात दरवर्षी २०,००० लिटर पाण्याची बचत होईल. त्यामुळे भारतातील तसेच जगातील अनेक देशांतील पाण्याची बचत करण्यासाठी मोठा हातभार लागेल. लिव्हप्युअरने झिंगरँड प्लॅटिनो+ कॉपर लाँच केले असून याद्वारे ७० टक्के पाण्याची रिकव्हरी मिळते. तसेच ग्राहकांच्या पैशांना चांगले मूल्यही प्रदान करते. झिंगरची किंमत १८९९० रुपये आणि प्लॅटिनो + कोपरची किंमत २२००० रुपये आहे.

लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नवनीत कपूर म्हणाले, ‘पाण्याची कमतरता हे जगातील सर्वात मोठे आव्हान असून भारतातही ते तितकेच महत्त्वाचे आहे. चार वर्षांपूर्वी आम्ही आरोतील पाण्यात खूप कमी पाण्याची रिकव्हरी मिळण्याच्या समस्येवर गुंतवणूक करायला सुरुवात केली. २०१७ पासून लिव्हप्युअरने इस्रायलमधील अनेक इनोव्हेशन प्रोजेक्टला पुरस्कृत केले आहे. दोन देशांतील सरकारांतर्फे इंडिया इस्रायल इनोव्हेशन ब्रिजद्वारे हा उपक्रम चालतो. यामुळे आम्हाला पाण्याची पुनर्प्राप्ती वाढवणारे आरओ विकसित करण्यास मदत मिळाली. हे भारतातील पाण्याची स्थिती पाहता हे खूप योग्य संशोधन आहे. लिव्हप्युअरने भारतीय ग्राहकांना नावीन्यपूर्ण उत्पादने प्रदान करण्यासाठी सातत्याने आरअँडडीमध्ये गुंतवणूक केली आहे. स्मार्ट आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या माध्यमातून संपूर्ण सुरक्षेची खात्री देताना आम्ही खूप उत्सुक आहोत. यासोबतच, ग्राहकांना जलसंवर्धनात योगदान देण्यास सक्षम करू शकणार आहोत.’

Exit mobile version