Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय लष्कराच्या कमांडर परिषदेला आजपासून सुरुवात.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय लष्कराच्या कमांडर परिषदेला आजपासून सुरुवात होणार आहे. लष्कराच्या या सर्वोच्च पातळीवरील चार दिवसांच्या परीषदेचं अध्यक्षपद लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे भूषवणार आहेत.

या परिषदेत धोरणात्मक निर्णय घेतले जातात. या परिषदेला लष्कराचे सर्व कमांडर आणि लष्करी मुख्यालायांचे प्रमुख उपस्थित असतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत, नौदल प्रमुख अॅडमिरल करमबिर सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदोरिया हे उद्या या परिषदेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

Exit mobile version