तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर पंतप्रधानांचा आज दूर दृश्यप्रणालीद्वारे संवाद.
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आणि, पेट्रोलियम आणि भुगर्भ वायू मंत्रालयानं आयोजित केलेल्या वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जगातील प्रमुख तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत.
भारत हा कच्च्या तेलाचा तिसरा मोठा खरेदीदार देश असून एलएनजी चा चौथा सर्वांत मोठा आयातदार देश असल्यानं जागतिक तेल आणि वायू क्षेत्रात भारताचं स्थान महत्वाचं आहे. त्यामुळं केवळ निष्क्रिय खरेदीदाराच्याच भूमिकेत न राहता या क्षेत्रातील घडामोडींमध्ये सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनं गेल्या पाच वर्षांपासून नीती आयोग दर वर्षी पंतप्रधानांचा तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद घडवून आणत आहे.
या कार्यक्रमात जागतिक कंपन्यांचा सहभाग वाढत असून आज जवळपास 45 प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.