Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत दक्षता सप्ताह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पासून दोन नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रीय दक्षता सप्ताह पाळण्यात येणार आहे. दक्ष भारत समृद्ध भारत ही यावर्षीची संकल्पना आहे. नवी दिल्लीतल्या केंद्रीय दक्षता आयुक्तालयात, केंद्रीय दक्षता आयुक्त संजय कोठारी यांनी यानिमित्त दक्षतेची शपथ दिली.

  आपण प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे, सचोटीनं आणि विश्वालसार्हतेनं करावं असं कोठारी यांनी यावेळी बोलताना सांगितलं. देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत वल्लभभाई पटेल यांचा ३१ ऑक्टोबर हा जयंती दिवस येत असलेला आठवडा, दरवर्षी देशभर राष्ट्रीय दक्षता सप्ताह म्हणून पाळला जातो.

केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयनं यानिमित्त नवी दिल्लीत, भ्रष्टाचार प्रतिबंध आणि दक्षता या विषयावर तीन दिवसांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली असून तिचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत.

  राज्यातला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आजपासून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करत आहे. राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना अथवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा असं आवाहन मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी  केलं आहे.

Exit mobile version