Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कर्जदारांचे व्याजावरील व्याज माफ करा – रिझर्व बँकेचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांनी दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जांसाठी, १ मार्च २०२० पासून पुढच्या सहा महिन्यांतल्या कर्ज सवलतीची रक्कम, संबंधित कर्जदारांच्या खात्यात जमा करावी, असे रिझर्व्ह बॅकेने सांगितले आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार कर्जदारांना १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० या सहा महिन्यांतल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातल्या फरकाची रक्कम परत मिळणार आहे.

बॅकांनी येत्या पाच नोव्हेंबरपर्यंत ही रक्कम कर्जदारांच्या खाती जमा करावी, असे रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

गृह कर्जाबरोबरच शिक्षणासाठी घेतलेले कर्ज, वाहन कर्ज, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीचे कर्ज, व्यावसायिकांचे वैयक्तिक कर्ज अशा काही कर्जांना ही सवलत देण्यात आली आहे.

Exit mobile version