Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – मध्य आशिया संवादाची दुसरी बैठक आज दूर दृश्य प्रणालीद्वारे होत आहे. या बैठकीत भारत, कझाकस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सहभागी होणार आहेत. तसंच किरगिझ रिपब्लिक या देशाचे परराष्ट्र खात्याचे उपमंत्री आणि अफगाणिस्तानचे हंगामी परराष्ट्र व्यवहार मंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत राजकीय, सुरक्षा, आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांसह समान महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे. भारत- मध्य आशियामधील दळणवळण आणि विकास प्रकल्पांतील भागीदारी याबाबत प्रत्येक देशाचे मंत्री भूमिका मांडणार आहेत.

भारत- मध्य आशिया संवादाची पहिली बैठक गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झाली होती.

Exit mobile version