सर्व इमारती हरित आणि पर्यावरण पूरक करण्याबाबत विचार करणे आवश्यक – उपराष्ट्रपती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व इमारती हरित आणि पर्यावरण पूरक करण्याबाबत विचार करणे अत्यंत आवश्यक बनले असल्याचे मत उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी काल व्यक्त केले. सीआयआयच्या हरित इमारत कॉंग्रेसचे उद्घाटन नायडू यांनी दूर दृश्य प्रणालीद्वारे केले, त्यावेळी ते बोलत होते.
सरकार, वित्त आयोग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर सवलती देऊन किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने लोकांना हरित इमारतींसाठी प्रोत्साहन द्यावे, असा सल्ला नायडू यांनी यावेळी दिला.