Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बोरामणी विमानतळासाठी जमीन संपादन कराण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोरामणी इथल्या नियोजित विमानतळासाठी अतिरिक्त २९ पूर्णांक ९४ शतांश हेक्टर खाजगी जमिनीसह एकुण सुमारे ५८० हेक्टर जमीन संपादन करायला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच अतिरिक्त खाजगी जमिन संपादनापोटी होणाऱ्या ४६ कोटी २९ लाख अतिरिक्त खर्चासह एकूण १२२ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चालाही शासनाने सुधारित वित्तीय मान्यता दिली आहे.

या रकमेपैकी ४० कोटी निधी चालू आर्थिक वर्षाच्या तरतुदीत वितरीत होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल घेण्यात आला.

वितरित होणारा निधी बँक खात्यात जमा न करता विहीत प्रयोजनातून खर्च होण्याची खातरजमा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने करावी तसेच वेळोवळी आढावा घेऊन खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Exit mobile version