कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवावेत अशी मागणी करणारं पत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे. सध्याची 25 मेट्रिक टन कांदा खरेदीची मर्यादा वाढवून ती 1500 मेट्रिक टनांपर्यंत वाढवावी अशी मागणी ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.
रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र हे देशातलं अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या अक तृतियांश उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. देशाच्या एकूण कांदा निर्यातीतही महाराष्ट्राचा वाटा ८० टक्के असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. मागच्या रब्बी हंगामात कांदा उत्पादनाचं क्षेत्र वाढले असून अंदाजे १०० लाख टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
या निर्बंधांमुळे कांदा लिलाव बंद झाले असून, सर्वसामान्यांना त्याची झळ बसत असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.