Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य सरकार शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार क्विंटल बियाण्यांचं अनुदानावर वाटप करणार – दादाजी भुसे

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणांचं अनुदानावर वाटप करणार आहे. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काल याबाबतची घोषणा केली. यासाठी राज्य सरकारनं ६२ कोटी ७९ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

कृषी विद्यापीठांनी नव्यानं संशोधित केलेल्या सुधारित आणि संकरित वाणांचा प्रसार करण्याच्यादृष्टीनं हे वाटप केलं जाणार असल्याचं भुसे यांनी सांगितलं. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान तसंच बियाणं आणि लागवड साहित्य उपअभियानाच्या माध्यमातून, ग्राम बिजोत्पादन या योजनेंतर्गत हा उपक्रम राबवला जाईल. दरम्यान राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात शाश्वत वाढ करता यावी, यासाठी राज्यभरातल्या एकूण ३६ हजार ४६४ हेक्टर क्षेत्रावर.

Exit mobile version