Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजेचे लाभ द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण दलातील एकल पुरुष कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजेचे लाभ (सीसीएल) द्यायला तसेच महिला अधिकाऱ्यांना सीसीएल तरतुदीत काही आणखी सवलती द्यायला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. अलिकडेच नागरी कर्मचाऱ्यांना सीसीएलचे लाभ देण्याच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या आदेशाच्या धर्तीवर हे लाभ देण्यात आले आहेत.

सध्या संरक्षण दलात केवळ महिला अधिकाऱ्यांना सीसीएल मिळत होती. सीसीएलचा लाभ घेण्यासाठी 40 टक्के दिव्यांग मुलांच्या बाबतीत पूर्वी असलेली 22 वर्षांची वयोमर्यादा हटवण्यात आली आहे. याशिवाय एकाच वेळी घेता येणारी किमान सीसीएल रजा आता 15  ऐवजी पाच दिवस करण्यात आली आहे.

Exit mobile version