भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था):पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने भारत आणि इस्रायलमधील आरोग्य आणि औषधे या क्षेत्रातील सामंजस्य करारास मंजूरी दिली आहे.
या सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्य अंतर्भूत आहेः
1. वैद्यकिय व्यावसायिक व इतर आरोग्य व्यावसायिक यांचे आदानप्रदान व प्रशिक्षण
2. मानव संसाधन आणि आरोग्य सुविधांच्या स्थापनेत परस्परसहकार्य
3. औषधनिर्माण, वैद्यकिय उपकरणे आणि सौंदर्यसाधने यांच्या प्रमाणीकरणाबद्दलच्या माहितीचे आदानप्रदान
4. हवामानासंबधित धोक्यांनुसार नागरिकांचे आरोग्य परिक्षण आणि धोक्यांचे निराकरण वा अनुकूलन यावर आधारित सार्वजनिक आरोग्याशी संबधित कृती यांच्या मूल्यांकनांतील कौशल्याचे आदानप्रदान
6. अनेक संबधित क्षेत्रांमध्ये परस्परसंवादी संशोधनाला चालना देणे
7. आणि परस्पर सहमतीने इतर सामायिक क्षेत्रात सहकार्य.
प्रत्येक पक्षाने दुसऱ्या पक्षाच्या संबधित व्यवस्थापनाकडून आयोजित गोलमेज सभा, परिसंवाद, सिम्पोजिया, कार्यशाळा आणि परिषदांना उपस्थिती लावण्यासाठी आपापल्या देशातील प्रतिऩिधींना प्रोत्साहन देणे.