Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत आणि स्पेन यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि स्पेनदरम्यान विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच खगोलशास्त्र विषयक तंत्रज्ञान सहकार्याबाबच्या  सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली. भारतीय खगोलविज्ञान संस्था, बंगरूळू आणि स्पेनची समकक्ष संस्था –आयएसी यांच्यात  हा करार करण्यात आला आहे, अशी माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली.

या सामंजस्य कराराअंतर्गत, 1) नवे वैज्ञानिक निष्कर्ष; 2) नवी तंत्रज्ञाने;3) वैज्ञानिक परस्परसंवाद आणि प्रशिक्षण यांच्या माध्यमातून क्षमता बांधणी; 4) संयुक्त वैज्ञानिक प्रकल्प इत्यादी.

या सामंजस्य करारांतर्गत, संयुक्त संशोधन प्रकल्प, कार्यक्रम, सेमिनार यांचेही आयोजन करता येईल. हा सामंजस्य करार, सर्व गुणवत्ता असलेले वैज्ञानिक, विद्यार्थी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांसाठी लागू राहील. तसेच केवळ वैज्ञानिक गुणवत्ता आणि अनुभवाच्या जोरावरच कराराचा वापर करता येईल. या अंतर्गत, खंडित स्वरूपाचे टेलिस्कोप तंत्रज्ञान आणि रोबोटिक तंत्रज्ञान विकसित करणे, त्याशिवाय इतर अनेक वैज्ञानिक क्षेत्रात परस्पर सहकार्याचे धोरण.

Exit mobile version