पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स व विवेकानंद केंद्र पिंपरी चिंचवड शाखा यांच्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी सामंजस्य कराराच्या मसुद्यावर ‘यशस्वी’ संस्थेच्या आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे, विवेकानंद केंद्राच्या पिंपरी चिंचवड शाखा प्रमुख अरुणाताई मराठे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या सामंजस्य करारानुसार विवेकानंद केंद्राच्या सहकार्याने आयआयएमएसमधील विद्यार्थ्यांना विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्याधिष्ठित गुणवत्तेची वृद्धी व्हावी, त्यांच्यातील शैक्षणिक प्रगती बरोबरच मनुष्यबळ विकास क्षेत्राविषयी विविध कल्पनांचे आदण प्रदान करणे, दोन्ही संस्थांच्यावतीने एकत्रितरित्या चर्चासत्र, परिसंवाद, विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येतील.
व्यक्तिकेंद्रीत होत चाललेल्या समाजाला जागे करून देशातील युवाशक्तीला एकात्मतेच्या, विश्वबंधुत्व व मानवतेच्या मार्गावर नेण्यासाठी अशा सामंजस्य करारामुळे मदत होईल असा विश्वास यावेळी आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केला. यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून विवेकानंद केंद्राचे अविनाश गोखले, पुंडलिक मते यांच्यासह आयआयएमएसचे मोजके अध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पवन शर्मा यांनी केले.