Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी व योजनांना गती देण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांचे प्रश्न आणि समस्या तसेच त्यांच्यासाठीच्या योजनांना गती देणे आणि सध्याच्या योजनांतील अडचणी दूर करणे, नवीन योजना आखणे यासाठी विशेष कक्ष राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. वर्षा निवासस्थानी काल या संदर्भात बैठक बोलावली होती, त्यावेळी ठाकरे यांनी ही घोषणा केली.

महिलांचं जीवनमान सुधारण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यावर भर द्यायला हवा, जेणेकरुन  आधुनिक बाजाराच्या अनुषंगानं मागणीची पुर्तता केली जाईल, यावर त्यांनी भर दिला. महिलांच्या विकासाला बळ देण्याची आवश्यकता असून, महिला विकासाच्या योजना कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणं गरजेचं आहे.

यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देण्याची आपली भूमिका  आहे, असंही ते म्हणाले. महिला बचत गटांच्या उत्पादनांना दिल्ली हाटच्या धरतीवर बाजार उपलब्ध करुन देण्याच्या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीला महपौर किशोरी पेडणेकर, खासदार संजय राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version