Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सांगली जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक व्यक्ती, 36 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन केल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सांगली : जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 11ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावातील सुमारे 29 हजार 706कुटुंबांतील 1 लाख, 58 हजार 970लोक व 36 हजार 54 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

डॉ. चौधरी म्हणाले, मिरज तालुक्यातील20 गावातील 4 हजार 968 कुटुंबांतील25 हजार 375 लोक व 6 हजार 334जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावातील 7 हजार461 कुटुंबांतील 36 हजार 636 लोक व 11 हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37गावांतील 12 हजार 256 कुटुंबांतील65 हजार 547 लोक व 15 हजार 135जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावातील 605कुटुंबांतील 2 हजार 941 लोक व 2हजार 726 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार416 कुटुंबांतील 28 हजार 471 लोक व 608 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

मिरज तालुक्यातील 12, वाळवा तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 21 तसेच पलूस तालुक्यातील 25 आणि महानगरपालिका क्षेत्रातील 7 प्रभाग यांचा पूर्णतः संपर्क तुटला आहे. त्यापैकी वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात स्थलांतर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज व हरिपूर येथे स्थलांतरणाचे काम सुरू आहे.

Exit mobile version