भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल – पंतप्रधान
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत आणि इटली यांच्यातला द्विपक्षीय संवादामुळे काही नव्या क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ ज्युसेपे काँटी यांच्यात काल द्विपक्षीय आभासी शिखर परिषद झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेत मोदी बोलत होते.
२०१८ मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर परस्पर सहकार्याला चांगली गती मिळाली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात विविध क्षेत्रांमधील सहकार्याचे १५ करार करण्यात आल्याची माहिती पश्चिम युरोप विभागाचे संयुक्त सचिव संदीप चक्रवर्ती यांनी दिली.