परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार – धनंजय मुंडे
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठांमधे उच्च शिक्षण घेणाऱ्या, अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ, ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीनं शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. परदेशात शिकणारे असे विद्यार्थी संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावेत, अशी अट होती ती आता शिथिल केली आहे.
परदेशी शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही सामाजिक न्याय विभागानं जाहीर केली आहे.