Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेची खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी तेबारावीपर्यंतच्या शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंदकरता येणार नाहीत.

अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, असंही तेम्हणाले.या बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा आदी उपस्थितहोते.शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणीयासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे.

तसंच शिक्षकांची आरोग्य तपासणीकरणार, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

Exit mobile version