सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व चारचाकी वाहनांना येत्या १ जानेवारी २०२१ पासून फास्टटँगचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रिय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. १ डिसेंबर २०१७ पूर्वी खरेदी केलेल्या एम आणि एन श्रेणीतल्या वाहनांना हा नियम लागू असेल. राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहनांना ऑक्टोबर २०१९ पासूनच हा नियम लागू केला आहे. पथकर नाक्यांवर यापुढे फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातनंच भरणा केला जाईल.