Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत–चीन कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत – चीन दरम्यान 6 नोव्हेंबर रोजी चुशूल येथे कोर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची आठवी फेरी आयोजित करण्यात आली होती. भारत– चीन सीमा भागातील पश्चिम विभागाच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरील असमहतींच्या मुद्यांवर दोन्ही बाजूंनी स्पष्ट, सखोल आणि रचनात्मक आदानप्रदान करण्यात आले. दोन्ही देशांच्या नेत्यांकडून पार पडलेल्या महत्त्वपूर्ण सहमतीची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच आघाडीवरील सैन्याने संयम बाळगणे आणि गैरसमज आणि गैरवर्तन टाळणे याबाबत दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. दोन्ही बाजूंनी संवाद कायम ठेवण्याबाबत आणि सैन्याच्या माध्यमातून आणि मुत्सद्दी माध्यमातून संपर्क ठेवण्याबाबत सहमती दर्शविली आणि या बैठकीत चर्चा पुढे नेऊन इतर सीमावर्ती बाबींवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला, जेणेकरून सीमाभागात एकत्रितपणे शांतता आणि सुव्यवस्था राखता येईल. बैठकीची आणखी एक फेरी लवकरच घेण्याबाबत देखील त्यांनी सहमती दर्शविली.

Exit mobile version