Site icon साप्ताहिक एकच ध्येय

‘नवभारत’ निर्मितीत आघाडीची भूमिका बजावण्याचे संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे मुलांना आवाहन

नवी दिल्ली : भारताला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मुलांना केले. ते आज 41 सरकारी शाळांमधील 3500 मुलांना संबोधित करत होते. 15 ऑगस्ट 2019 रोजी ऐतिहासिक लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ही मुले ‘नया भारतचे ‘ दर्शन घडवणार आहेत. 700 राष्ट्रीय छात्रसैनिक देखील यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान आपल्या भाषणात जी मूल्ये सांगतील ती विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये रुजवावीत असे आवाहन श्रीपाद नाईक यांनी केले.

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीचा भाग म्हणून गेले काही दिवस आव्हानात्मक हवामान असूनही तासनतास एकाच जागी बसून विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या चिकाटीची त्यांनी प्रशंसा केली. तुमच्या कठोर परिश्रमांबद्दल तुम्हाला स्मृतिचिन्ह देताना मला खूप आनंद होत आहे असे ते म्हणाले.

संरक्षण राज्यमंत्र्यांनी प्रत्येक सहभागी शाळेच्या एका शिक्षक आणि एका विद्यार्थ्याला तसेच एनसीसीच्या युनिट-इन -चार्ज  आणि छात्रसैनिकाला स्मृतिचिन्हे प्रदान केली.

Exit mobile version