कारखानदारी व निर्यातीला चालना देण्यासाठी उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला मंजुरी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या कारखानदारी क्षमता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी दहा महत्वाच्या क्षेत्रांकरता उत्पादनाधारित प्रोत्साहनपर सवलत योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बातमीदारांना ही माहिती दिली. दूरसंचार आणि नेटवर्किंग उत्पादनं, औषधं निर्मिती, स्वयंचलित वाहनं आणि त्याचे घटक, वस्त्रोद्योग आणि अन्न उत्पादनं या क्षेत्रांचा त्यात समावेश आहे.
या योजनेमुळे भारतीय कारखानदारी जागतिक स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षम होईल, गुंतवणूक आकर्षित करेल, निर्यात वाढवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे उत्पादन आणि निर्यातीबरोबरच देशात रोजगाराच्या संधीही वाढतील, असं ते म्हणाले. फिक्कीनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.