Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक २३ शतांश टक्के

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ९ हजार १६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत पंधरा लाख ९७ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक २३ शतांश टक्के झालं आहे.

काल आणखी ४ हजार ९०७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ३१ हजार ८३३ झाली आहे. सध्या ८८ हजार ७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १२५ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात या विषाणू संसर्गाने आतापर्यंत ४५ हजार ५६० रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यू दर २ पूर्णांक ६३ शतांश टक्के असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

वाशिम जिल्ह्यात काल २७ तर आतापर्यंत ५ हजार ५१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १९ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ५ हजार ८२४ झाली आहे. सध्या १६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात काल ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १८ हजार ५४७ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल २८ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांची संख्या १९ हजार ५४० वर पोचली आहे. सध्या २८४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात काल एक, तर आतापर्यंत ५३४ रुग्णांचा बळी गेला आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल ७ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली. आतापर्यंत ३ हजार ८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल २ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे रुग्णांचा आकडा ३ हजार २२५ वर गेला आहे सध्या ८५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

परभणी जिल्ह्यात काल १८ तर आतापर्यंत ६ हजार ३७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल १८ रुग्णांना या आजाराची लागण झाली, त्यामुळे बाधितांची संख्या ६ हजार ८५४ झाली आहे. सध्या २०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यातला मृतांचा आकडा २७५ झाला आहे.

भंडारा जिल्ह्यात काल ७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ३६९ झाली आहे. काल ४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९ हजार २६४ झाली आहे. सध्या ७३९ रुग्ण उपचार घेत आहेत जिल्ह्यात आतापर्यंत २३१ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

सातारा जिल्ह्यात काल ३०१ तर आतापर्यंत ४४ हजार १७५ रुग्ण मुक्त झाले आहेत. काल ११३ नवीन बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८ हजार २९६ झाली आहे. सध्या २ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १ हजार ४२६ रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत.

Exit mobile version