नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमांवर केंद्र शासनाचा अंकुश असणं, ही बाब समाधानकारक आहे, असं मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.
देशातली विविध माध्यमं कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या नियमांच्या अखत्यारित राहून काम करत असतात.
ओटीटी प्लॅटफोर्मस्वर मात्र अशा कोणत्याही प्रकारच्या संस्थेचं नियंत्रण नाही. मध्यंतरी महाराष्ट्राच्या सायबर सेलनं अश्लीलता आणि महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लावणाऱ्या निर्मिती संस्थांवर कारवाई केली होती.
मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही व्यावसायिक दबावाखाली येऊन स्त्रियांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणं, हे सरकारचं कर्तव्य आहे.
केंद्र सरकारच्या ह्या अधिसूचनेमुळे अशा सर्व गोष्टींवर निर्बंध घालणं शक्य होईल, असंही ते म्हणाले.