स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे मुंबईत जलावतरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलाची ताकद वाढवणाऱ्या स्कॉर्पीअन श्रेणीतल्या ‘वागीर’ पाणबुडीचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून मुंबईत जलावतरण केले. या कार्यक्रमाला पश्चिम नवदलाचे प्रमुख वाईस एडमिरल आर. बी. पंडित, उपस्थित होते.
ही पाणबुजी एक वर्षाच्या आत कार्यान्वीत होईल, असे सांगितले. भारतात बनलेल्या कलावरी-६ श्रेणीचा एक भाग आहे. फ्रांसच्या नवदलाच्या सहाय्याने भारतीय नौदलाच्या प्रकल्प-७५ अंतर्गत या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. या श्रेणीतल्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण २०१७ साली केले होते.