Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अत्याचारग्रस्त बालकं आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं आहे,- यशोमती ठाकूर

मुंबई (वृत्तसंस्था) : महिला आणि बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालण्याची, तसंच महिला आणि बालकांच्या सुरक्षितता आणि कल्याणासाठी नियोजनबद्धरित्या काम करण्याची ग्वाही महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

बालदिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांच्या कल्याणासाठी खूप काम करणं आवश्यक असून महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात करायची आहे, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.

अत्याचारग्रस्त बालकं आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या.

Exit mobile version