समाजभूषण डाॅ.बी.व्ही.राऊत यांच्या शुभहस्ते काव्यातील नक्षञ ई मासिकाचे प्रकाशनाचे आयोजन
Ekach Dheya
भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचावतीने दीपावली पाडवा सोमवार दि. १६ नोव्हेंबर २०२० या दिनी “काव्यातील नक्षञ” मासिकाच्या सातव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. नक्षञाचं देणं काव्यमंच, पुणेतर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे हे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षञ” आहे. कवींच्या हक्काचे, सन्मानाचे, आदराचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.
२१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रमढ यशस्वी केले आहे. ई मासिकाच्या माध्यमातुन कवी-कवयिञींना लिहिते करुन, त्यांच्या कवितांना यात स्थान दिले आहे. “काव्यातील नक्षञ” हे विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते. त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घेऊन, अनेकांना पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहान करण्यात आले आहे.
प्रकाशन सोहळा विशेष अतिथी म्हणुन मा.समाजसेवक शिक्षणतज्ञ श्री. ज्ञानेश्वर मडके साहेब
(सहाय्यक प्रकल्प अधिकारी-कोल्हापूर)
या प्रसंगी प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे म्हणुन
मा.कविवर्या कीर्ती लंगडे, (नागपूर विभागप्रमुख-नक्षञाचं देणं काव्यमंच) ,
मा.कविवर्या दीपाली लोखंडे-कट्टर नक्षञ (जालना– नक्षञाचं देणं काव्यमंच),
मा.कविवर्या ज्योती शिंदे-कट्टर नक्षञ (रोहा,रायगड -नक्षञाचं देणं काव्यमंच),
मा.कविवर्या विद्या माने (कट्टर नक्षञ-मंगळवेढा-सोलापूर- नक्षञाचं देणं काव्यमंच),
मा.कविवर्य श्री शाहू संभाजी भारती (संपादक-डिजीटल शैक्षणिक दैनिक-रयतेचा वाली व उपसंपादक-काव्यातील नक्षञ),
मा.कविवर्य केवलचंद शहारे (सडक अर्जुनी तालुका प्रमुख-भंडारा- नक्षञाचं देणं काव्यमंच),
मा.कविवर्या सौ.रेखा राऊत -कट्टर नक्षञ (कळमेश्वर-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्या सौ.मंगल कु-हाडे-कट्टर नक्षञ (आळेफाटा, जुन्नर-नक्षञाचं देणं काव्यमंच), मा.कविवर्य पञकार प्रभाकर आवारी-कट्टर नक्षञ (चंद्रपूर तालुकाप्रमुख, नक्षञाचं देणं काव्यमंच) इ. ऑनलाईन उपस्थित राहणार आहे.
प्रकाशन सोहळा-दीपावली पाडवा सोमवार दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी सांयकाळी ४.०० वा आयोजन केले आहे. संयोजक-संपादक-कवी वादळकार, पुणे व नक्षञाचं देणं काव्यमंच आणि नक्षञ परिवार तर्फे संयोजन करण्यात आले आहे.