Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ५ शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ पूर्णांक ५ शतांश टक्के झालं आहे. काल दिवसभरात देशात ४७ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले, आतापर्यंत एकूण ८१ लाख ६३ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४४ हजार ६८४ नव्या रुग्णांची नोंद झाली.

त्यामुळे देशातली एकूण बाधितांची संख्या ८७ लाखापेक्षा अधिक झाली आहे. देशात सध्या ४ लाख ८० हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात कोविड १९च्या रुग्णसंख्येत घट होत असून, उपचाराधीन रुग्णांचं प्रमाण आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णसंख्येच्या केवळ ५ पूर्णांक ४८ शतांश टक्के राहिलं आहे.

दरम्यान राज्यात काल चार हजार ५४३ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ९ हजार ६०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ४८ शतांश टक्के झालं आहे. काल आणखी ४ हजार १३२ कोविड बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ४० हजार ४६१ झाली आहे.

सध्या ८४ हजार ८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल १२७ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४५ हजार ८०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version