Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आचार्य विनोबा भावे यांचा स्मृतीदिनी त्यांना अभिवादन

मुंबई (वृत्तसंस्था) : थोर गांधीवादी नेते, भूदान चळवळीचे प्रणेते, भारतरत्न, आचार्य विनोबा भावे यांचा आज स्मृतीदिन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनोबाजींना आदरांजली वाहिली. आचार्य विनोबाजींनी गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गानं जात विचार परिवर्तनातून समाजपरिवर्तनाचं अलौकिक कार्य केलं.

भूदान चळवळीतून भूमिहिन बांधवांना लाखो एकर जमीन मिळवून दिली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महात्मा गांधीजींचे पहिले वैयक्तिक सत्याग्रही ते सर्वोदय चळवळ हा त्यांचा प्रवास एका महान संताचा, कृतीशील विचारवंतांचा, प्रखर राष्ट्रभक्ताचा प्रवास आहे.

ग्रामविकासातून राष्ट्रविकासाचं त्यांचं स्वप्न पूर्ण करणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे, असं  आजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

Exit mobile version