Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात काल ५ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त

Tezpur: A COVID-19 suspected family being taken to Tezpur Medical College and Hospital, at a containment zone in Tezpur, Saturday, Aug 1, 2020. (PTI Photo)(PTI01-08-2020_000135B)

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून  ९२ पुर्णांक ६४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले एकूण १६ लाख २३ हजार ५०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात काल २ हजार ८४० नव्या कोरोनाबाधितांचीही नोंद झाली. यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ झाली आहे. काल राज्यभरात ६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यामुळे राज्यातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४६ हजार १०२ झाली आहे.

सध्या राज्यातला कोरोना मृत्यूदर २ पुर्णांक ६३ शतांश टक्क्यावर स्थिर आहे. सध्या राज्यभरात ८१ हजार ९२५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ७७६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४० हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर या आजारानं आतापर्यंत १ हजार १२० रुग्णांचा मृत्यू झाला असुन सध्या ५८२ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात काल दिवसभरात ९४ जण  नव्यानं कोरोना बाधित झाले तर ७ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४९ हजार ५१  झाली असून आतापर्यंत ४४ हजार ९७४ जणांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आजवर १ हजार ६५३ मृत्यू झाले असून २ हजार ४२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

परभणी शहरासह जिल्ह्यात काल दिवसभरात १० व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६ हजार ९२२ झाली आहे. बरे झाल्यानं काल १८ जणांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आजपर्यंत  बरे झालेल्यांची संख्या ६ हजार ४७६ झाली आहे. परभणी जिल्ह्यात काल एका रूग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या २७८ झाली आहे. तर १६८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

Exit mobile version