Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सांगली जिल्ह्यात तीन लाखांहून अधिक व्यक्ती, ४२ हजारांहून अधिक जनावरे विस्थापित – जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

सांगली : सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण 104 पूरबाधित गावांतील सुमारे 34 हजार 917 कुटुंबांतील 3 लाख, 11 हजार 485लोक व 42 हजार 494 जनावरे यांचे विस्थापित झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 11 हजार 34 कुटुंबातील 49 हजार530 व्यक्ती आणि 16 हजार 363 जनावरे यांचे प्रशासकीय कँपमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. 23 हजार 883 कुटुंबातील 1 लाख 24 हजार 955 व्यक्ती आणि 26 हजार 131 जनावरे हे नातेवाईक व स्वतःच्या सोयीनुसार विस्थापित झाले आहेत. सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 37हजार व्यक्ती नातेवाईक व स्वतःच्या सोयीनुसार विस्थापित झाले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 881 कुटुंबांतील 15 हजार 522 लोक व 720जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील 1 लाख 37 हजार व्यक्ती नातेवाईक व स्वतःच्या सोयीनुसार विस्थापित झाले आहेत.

पूरबाधित अन्य चार तालुक्यातील विस्थापितांचा संख्येत बदल झाला नाही. मिरज तालुक्यातील 20 गावांतील 10 हजार 476 कुटुंबांतील 52 हजार 514 लोक व 12हजार 661 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 25 गावांतील 7 हजार 651 कुटुंबांतील 37 हजार 720 लोक व 11हजार 251 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 37 गावांतील 12 हजार 256 कुटुंबांतील 65 हजार 547 लोक व 15 हजार 135 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 21 गावांतील 653 कुटुंबांतील 3 हजार 182 लोक व 2 हजार727 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

Exit mobile version