राज्यात महाआवास अभियानाअंतर्गत १०० दिवसात ८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना घरं देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्याच्या ग्रामीण भागातल्या नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात कालपासून ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत “महाआवास अभियान-ग्रामीण” राबवले जाणार आहे.
राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुलं तसंच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुलं पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राष्ट्रीय आवास दिनानिमित्त काल मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते.