मुंबई (वृत्तसंस्था) : सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या महागृहनिर्माण योजनेतल्या पहिल्या टप्प्यातल्या १५ हजार घरांचा ताबा मार्च २०२१ अखेर देण्याची संपूर्ण तयारी झाली असल्याचं सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं.
त्यांनी काल या प्रकल्पाच्या विकासाचा आढावा घेतला. तसंच पुढच्या वर्षी परवडणाऱ्या ६५ हजार घरांचा महाप्रकल्प आकारात येत असून त्याची नोंदणी पुढच्या वर्षी सुरू होईल. हा गृहनिर्माण प्रकल्प एकूण ४ पॅकेजमध्ये साकारण्यात येत आहे. , असंही ते म्हणाले.
डिसेंबर, २०१८ मध्ये ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ झाला होता. वाशी ट्रक टर्मिनस, खारघर रेल्वे स्थानक, खारघर बस टर्मिनस, खारघर बस आगार, कळंबोली बस आगार, पनवेल आंतरराज्यीय बस स्थानक, नवीन पनवेल बस आगार, आदी ठिकाणी हा प्रकल्प उभा राहत आहे.