राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९३ टक्क्याच्या उंबरठ्यावर
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४ हजार ८८ रुग्ण कोविड मुक्त झाल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यभरात या संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १६ लाख ४७ हजार ४ झाली असून, राज्यातलं कोरोनामुक्तीच प्रमाण ९२ पूर्णांक ८२ शतांश टक्के झालं आहे.
काल कोरोना संसर्ग झालेले नवीन ५ हजार ७०८ रुग्ण आढळले. यामुळे राज्यात कोविड बाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ झाली आहे.राज्यात सध्या ७९ हजार ८७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात काल ६२ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला, राज्यभरात या संसर्गाने झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४६ हजार ५७३ झाली आहे, मृत्यूचा दर २ पूर्णांक ६२ शतांश टक्के एवढा आहे.
वाशिम जिल्ह्यात काल एक, तर आतापर्यंत पाच हजार ६३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल सात नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्णांची संख्या पाच हजार ९४५ झाली आहे. सध्या १६७ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात काल पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत सहा हजार ५९३ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल बारा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्णांचा आकडा सहा हजार ९७३ वर पोचला आहे. सध्या ९४ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत २८६ रुग्णांचा या आजारामुळे बळी गेला आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल पाच रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १९१ रुग्णांना घरी सोडल आहे. काल चार बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या ३ हजार २५६ वर पोचली आहे. सध्या १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात काल ६६, तर आतापर्यंत १० हजार २१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल नव्याने ९१ रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ७८९ झाली आहे. सध्या ४४१ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १३४ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.
सातारा जिल्ह्यात काल २३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार ५३ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल ११८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, जिल्ह्यातली रुग्ण संख्या वाढून ४९ हजार ५६६ झाली आहे. सध्या ८३५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६७८ रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत.
धुळे जिल्ह्यात काल २३ कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे धुळे जिल्ह्यात १३ हजार २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नविन १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले, आता जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १३ हजार ७७५ वर पोचली आहे. तसेच सक्रीय रुग्णांची संख्या घटून १४१ इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यात काल ३१९ तर आतापर्यंत ६२ हजार ५९६ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल २५२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ६५ हजार ८३२ झाली आहे. सध्या १ हजार ५१३ रुग्ण उपचार घेत आहेत. काल सहा रुग्णांचा मृत्यू झाला.
जळगाव जिल्ह्यात काल ३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ५२ हजार ३६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ५९ रुग्णांना या आजाराची लागण झाली, त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या ५४ हजार ४८ झाली आहे. सध्या ३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार २८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.