Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. याबरोबरच राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले एकूण १६ लाख ५४ हजार ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात काल ४ हजार १५३ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १७ लाख ८४ हजार ३६१ झाली आहे.

काल ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या ४६ हजार ६५३ वर पोचली आहे. यामुळे राज्याच्या कोरोना मृत्यूदरात घट होऊन तो २ पुर्णांक ६१ शतांश टक्के झाला आहे.  राज्यभरात सध्या ८१ हजार ९०२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे ६३४ रुग्ण नव्यानं सापडले आहेत. आता जिल्ह्यात दोन लाख २४ हजार १६१ रुग्ण झाले आहेत तर, १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६०९ झाली.

नांदेड जिल्ह्यात काल ५३ तर आतापर्यंत १८ हजार ९४७ रुग्ण कोरोना मुक्त झाले. काल ३६ नवीन रुग्णांची नोंद झाली त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या २० हजार ४२ झाली आहे सध्या ३५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात आतापर्यंत ५४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात काल ६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार ७५५ रुग्ण बरे झाले आहेत. काल ७४ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्ण संख्या वाढून ७ हजार ५३० झाली आहे. सध्या ६९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत या आजारामुळे ७५ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल दोन रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार १९५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत काल तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णसंख्या ३ हजार २७० वर पोहोचली आहे सध्या २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात काल ४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४७ हजार १२२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे काल ७३ रुग्णांना या आजाराची लागण झाली, त्यामुळे बाधितांची संख्या ४९ हजार ८७९ वर गेली आहे. सध्या १ हजार ७४ रुग्ण उपचाराधीन आहेत. आतापर्यंत १ हजार ६८३ रुग्ण या आजारामुळे दगावले आहेत.

जालना जिल्ह्यात कोविडग्रस्तांची एकूण संख्या आता १२ हजार १५ झाली असून, जिल्ह्यातले अकरा हजार २३८ रुग्ण आतापर्यंत या आजारातून बरे झाले आहेत. तर ३०७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ४१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

परभणी जिल्ह्यात  काल ५, तर आतापर्यंत ६ हजार ६०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल १६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे रुग्णांचा आकडा ६ हजार ९९९ वर पोचला आहे. सध्या १०६ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात या आजारामुळे २८७ रुग्णांचा बळी गेला आहे.

वाशिम जिल्ह्यात काल सात रुग्ण कोरोना मुक्त झाले जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार ६५४ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. काल नव्यान १८ रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्ण संख्या ५ हजार ९६७ वर पोचली आहे. सध्या १६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १४५ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन हजार ७१२ कोविडबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातले ९४ हजार ४७६ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोविडबाधितांची एकूण संख्या ९८ हजार ९६४ झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ५०० झाली आहे. यापैकी ४० हजार ६०० रुग्ण आतापर्यंत कोविड संसर्गमुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एक हजार १३६ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे, तर सध्या ७६७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.

Exit mobile version