Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात सलग १७व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारापेक्षा कमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ४२ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८६ लाख ४ हजार ९५५ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामुक्तीचा दर ९३ पूर्णांक ७६ शतांश टक्क्यावर पोचला आहे.

काल दिवसभरात ३७ हजार ९७५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ९१ लाख ७७ हजार ८४० झाली आहे. गेल्या ८ नोव्हेंबरपासून सलग १७व्या दिवशी दररोज नोंद होत असलेल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारापेक्षा कमी आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं म्हटलं आहे.

काल ४८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशभरातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ३४ हजार २१८ झाली आहे. सध्या देशातल्या कोरोना मृत्यूदर १ पुर्णांक ४६ शतांश टक्क्यावर स्थीर आहे.

सध्या देशभरात ४ लाख ३८ हजार ६६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान देशभरात आत्तापर्यंत १३ कोटी ३६ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरनं दिली आहे.

Exit mobile version