राज्यात कोविड लसीचं वितरण आणि लसीकरणासाठी कृती दलाची स्थापना – मुख्यमंत्री
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक घेतली. लस आल्यानंतर राज्यात लसीकरणाची प्रक्रिया तसंच लसीच्या वितरणाचं व्यवस्थापन करायसाठी एका कृती दलाची स्थापना केली असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत प्रधानमंत्र्यांना दिली.
यादृष्टीनं राज्य सरकार सिरम इन्स्टिट्यूटसोबत सातत्यानं संवाद करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह इतर अधिकारीही या बैठकीत सहभागी झाले होते.