नवी दिल्ली : बॉम्बे सॅपर्सच्या द्विशतकीय मोटार सायकल रॅलीनिमित्त तसेच कारगिल युद्धादरम्यान बॉम्बे सॅपर्सनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी द्रास ते पुणे यादरम्यान साहसी मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जुलैला द्रास येथे लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल हसबनीस यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यात बॉम्बे सॅपर्स तुकडीचे दोन अधिकारी आणि इतर 11 जवान आहेत.
2000 कि.मी.चा प्रवास दोन आठवड्यात पूर्ण करून 11 ऑगस्टला हे जवान दिल्लीला पोहोचले. तिथे इंडिया गेट आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. आज लेफ्टनंट जनरल एस. के. श्रीवास्तव यांनी कश्मीर हाऊस येथे या सॅपर्सच्या पुढच्या प्रवासासाठी हिरवा झेंडा दाखवला. ही रॅली 21 ऑगस्टला पुण्यात पोहचणार आहे.