Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी चैत्यभूमी स्मारक इथं येऊ नये – आंबेडकरी संघटनांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन, येत्या ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी अनुयायांनी मुंबईत दादर स्थित चैत्यभूमी स्मारक इथं येऊ नये, असं आवाहन विविध आंबेडकरी संघटनांनी केलं आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जी-उत्तर विभाग कार्यालय आणि विविध आंबेडकरी संघटनांची काल बैठक झाली. अनुयायांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या कामात प्रशासनाला सहकार्य करावं, आणि सर्वांनी आपापल्या घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करावं असं आवाहनही या संघटनांनी केलं.

यावेळी प्रशासनाकडून चैत्यभूमीवरच्या सोहळ्यासाठी केल्या जात असलेल्या तयारीची माहिती बैठकीला उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली गेली. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्याची विनंती दूरदर्शनला करणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Exit mobile version