Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातल्या कोरोनाबाधीतांच्या संख्याने केला ९३ लाखाचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३९ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे देशभरातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८७ लाख १८हजार ५१७ झाली आहे.

सध्या देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ६५ शतांश टक्के आहे. देशात काल ४३ हजार ८२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं, यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९३ लाखाचा टप्पा पार करत, ९३ लाख ९ हजार ७८८वर पोचली आहे.

काल देशभरातल्या ४९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे कोरोनाबळींची एकूण संख्या १ लाख ५ हजार ७१५ झाली आहे. सध्या देशाचा कोरोना मृत्यूदर १ पुर्णांक ४६ शतांश टक्क्यावर स्थीर आहे. सध्या देशभरात ४ लाख ५५ हजार ५५५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version