Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला दिलेल्या मार्गदर्शक सूचना ३१ डिसेंबरपर्यंत कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात टाळेबंदीबाबतच्या नियमांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यानुसार, राज्यात, मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध कमी करण्याबाबत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला दिलेल्या मार्गदर्शक सूचना ३१ डिसेंबरपर्यंत लागू असतील. हिवाळ्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं सरकारने प्रतिबंधित क्षेत्रातली टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version