पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 5 लाख 32 हजार 322 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
Ekach Dheya
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 2 हजार 222 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 32 हजार 322 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 163 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 937 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.81 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 40 हजार 460 रुग्णांपैकी 3 लाख 21 हजार 92 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 98 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.31 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 50 हजार 755 रुग्णांपैकी 48 हजार 172 रुग्ण बरे होवून घरी गेले
आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 877 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 401 रुग्णांपैकी 41 हजार 555 रुग्ण बरे होवून घरी गेले
आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 255 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 591 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 704 रुग्णांपैकी 44 हजार 527 रुग्ण बरे होवून घरी
गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 483 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 694 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 2 रुग्णांपैकी 46 हजार 876 रुग्ण बरे होवून घरी गेले
आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 450 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 339 ने वाढ झाली
आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 898 , सातारा जिल्ह्यात 226, सोलापूर जिल्ह्यात 175, सांगली जिल्ह्यात 30 तर कोल्हापूर
जिल्ह्यात 10 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 956 आहे. पुणे जिल्हयामध्ये 674, सातारा जिल्हयामध्ये
94, सोलापूर जिल्हयामध्ये 127, सांगली जिल्हयामध्ये 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 40 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 28 लाख 19 हजार 960 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त
अहवालांपैकी 5 लाख 32 हजार 322 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )