Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात कोविड-१९च्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ९० हजारांच्या उंबरठ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ९३७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १६ लाख ७६ हजार ५६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक ४ शतांश टक्के झाले आहे.

काल आणखी ५ हजार ९६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख १४ हजार ८१५ झाली आहे. सध्या राज्यात ८९ हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रायगड जिल्हय़ात काल ८५ आतापर्यंत ५४ हजार २०७ रुग्णांनी कोरोना वर मात केली आहे. काल १२१ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्ण संख्या ५६ हजार ९८० झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६०३ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यात काल १८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ९५ हजार ८११ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल २५६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४२८ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या आजारामुळे आतापर्यंत १ हजार ७८५ रुग्णांचा बळी गेला आहे.

परभणी जिल्ह्यात काल १३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल २५ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांचा आकडा ७ हजार ७७ वर पोचला आहे. सध्या १२८ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

जळगाव जिल्ह्यात काल ४३ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५२ हजार ६४२ रूग्ण बरे झाले आहेत. काल ४५ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यान, बाधितांची संख्या ५४ हजार ५०२ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ५६४ रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार २९६ रूग्णांचा मृत्यू झाला.

सातारा जिल्ह्यात काल १२० रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार २९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ११२ बाधित रुग्ण आढळल्यामुळे, बाधितांची संख्या ५० हजार ९२४ झाली आहे. सध्या ९२२ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजारामुळे १ हजार ७१० रुग्ण दगावले आहेत.

नांदेड जिल्ह्यात काल ७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार १८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ६१ रुग्णांना कोरोनाची लागण झाली, त्यामुळे आतापर्यंत २० हजार ३२५ रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. सध्या ४०४ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५४८ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल ६ तर आतापर्यंत ३ हजार २१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल ३१ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णसंख्या ३ हजार ३५३ वर पोचली आहे. सध्या ९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यात काल २३ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आतापर्यंत ११ हजार ५९२ रुग्णांना घरी पाठवले आहे. काल 36 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १२ हजार २४० झाली आहे सध्या ३३५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात काल ३३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले जिल्ह्यात या आजारातून बरे झालेल्यांची संख्या ६० हजार ३१४ झाली आहे काल ३०७ नवीन रुग्ण आढळले. सध्या १७५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version