दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने राजधानी दिल्लीत अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या सेवा क्षेत्रांत काम करणाऱ्यांना घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
हे निर्बंध खाजगी कंपन्यांना देखील लागू असून या आदेशानुसार, संबंधित अस्थापनांच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय अधिकारी, स्वायत्त संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहावे आणि अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आवश्यकतेसुसार कर्तव्ये बाजावावीत, असे निर्देश दिले आहेत.