Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल – नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे सर्वच औद्योगिक आणि अन्य क्षेत्रांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले. अशा स्थितीतही ऑटोमोबाईल क्षेत्राने मात्र चांगली कामगिरी केली ही आनंदाची बाब आहे. आगामी काळात ‘टू व्हिलर टॅक्सी’ ही संकल्पना रोजगार निर्मितीची नवीन वाट ठरेल, असा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

एफएडीए गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांसोबत दृकश्राव्य माध्यमातून गडकरी यांनी काल संवाद साधला. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, टू व्हिलर टॅक्सीला इलेक्ट्रॉनिक मीटर लावून टॅक्सी म्हणून चालविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे कुणालाही पैसा कमावता येणार आहे.

एकट्या व्यक्तीला बस, रेल्वे स्टेशनवर पोहोचायचे असल्यास ही टॅक्सी सुविधा अत्यंत फायदेशीर ठरेल.

Exit mobile version