देशातील सर्व रेल्वेस्थानकांवर प्लॉस्टिक कप ऐवजी मातीच्या भांड्यातून चहाची विक्री होणार – पियुष गोयल
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सर्व रेल्वेस्थानकांवर प्लॉस्टिक कप ऐवजी मातीच्या भांड्यातून चहाची विक्री केली जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल दिली. प्लॉस्टिकमुक्त भारत अभियानाअंतर्गंत उचलेले हे एक पाऊल आहे, असे ते म्हणाले.
देशातल्या रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण करण्याचे काम वेगाने सुरु असून गेल्या सहा वर्षात १८ हजार ६०५ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले असून तेही पर्यावरणपूरक असल्याचे गोयल यांनी अलवार इथे सांगितले.