Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात काल ४ हजार ९३० नवे रुग्ण कोविडग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल चार हजार ९३० नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे.

राज्यभरात काल ९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर दोन पूर्णांक ५८ शतांश टक्के झाला आहे. तर काल सहा हजार २९० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं.

राज्यात आतापर्यंत १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९२ पूर्णांक ४९ शतांश टक्के एवढा झाला आहे. सध्या राज्यात ८९ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version