मुंबई (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांच्या निवडणूकीची मतमोजणी, बालेवाडी इथल्या श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात आज सकाळी ८ वाजता सुरु झाली. जिल्ह्यातल्या कोविड १९ च्या सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मतमोजणीच्या ठिकाणी असलेले अधिकारी-कर्मचारी तसंच सुरक्षा अधिकाऱ्यांनी मास्क, सॅनिटाइझर, हातमोजे, फेस शिट्स पुरवल्या आहेत.
नागपूर पदवीधर मतदार संघात १ लाख ३२ हजार ९२३ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. भाजपाचे संदीप जोशी आणि महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी य़ांच्यासह १९ उमेदवार रिगंणात होते, तर अमरावती शिक्षण मतदार संघात २७ उमेदवार रिगंणात होते. तिथं ३० हजार ८६९ म्हणजे ८६पूर्णांक ७३ शतांश टक्के मतदारांनी हक्क बजावला.
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद पोटनिवडणूकीतले भाजपाचे उमेदवार अमरिश पटेल यांचा विजय झाला आहे त्यांनी ४३७ पैकी ३३२ मत मिळवली. महाविकास आघाडीचे अभिजित पटेल यांना ९८ मतं मिळवली.